How to Get Domicile Certificate : डोमिसाईल प्रमाणपत्र कसे काढणार जाणून घ्या ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया, 15 दिवसाच्या आत मिळेल प्रमाणपत्र

असा करा ऑनलाईन अर्ज : सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट वर नवीन वापरकर्ता नोंदणी पर्यायावर क्लिक करा.
त्या ठिकाणी नाव, मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी टाकून लॉग इन करा.
लॉग इन केल्यानंतर डॅशबोर्डवर विविध विभाग दिसतील. त्यामध्ये महसूल विभाग आणि नंतर महसूल सेवा निवडा.
त्यानंतर Age, Nationality and Domicile Certificate हा पर्याय निवडा.
आवश्यक कागदपत्रांची यादी तेथे सादर केली जाईल. तसेच वैयक्तिक माहिती, पत्ता आणि इतर माहिती सादर करावी.
वेबसाइटवर अपलोड करावयाची कागदपत्रे 75 ते 500 KB च्या आत असायला हवीत.
फोटो आणि स्वाक्षरी अपलोड केल्यानंतर अर्ज सादर करावा.
प्रमाणपत्र मिळेपर्यंत फी भरल्याची पावती जवळ ठेवावी. Domicile certificate apply online

डोमेसाइल प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी

येथे क्लिक करा

महाराष्ट्रात अधिवास प्रमाणपत्र ऑफलाइन कसे मिळवायचे ?
उपविभागीय कार्यालय, तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट द्या.
‘वय राष्ट्रीयत्व अधिवास प्रमाणपत्र’ अर्ज प्राप्त करा. domicile certificate application form
प्रमाणपत्रासाठी अर्ज भरा आणि आवश्यक कागदपत्रांसोबत संबंधित कार्यालयात सबमिट करा.
त्या नंतर निवासी प्रमाणपत्राच्या स्थितीचा मागोवा घेण्यासाठी अर्जदाराला एक पावती क्रमांक दिला जाईल. domicile certificate documents marathi