Gramsevak Bharti नमस्ते विद्यार्थी मित्रांनो ग्रामसेवक भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे जिल्हा परिषदेतर्फे ग्रामविकास विभाग अंतर्गत तब्बल १० हजार पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासंदर्भात शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
ग्रामसेवक भरती
येथे क्लिक करा
Gramsevak Bharti ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील सर्व संवर्गाची (वाहनचालक व गट- ड संवर्गातील पदे वगळून) सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या ८०% मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यात येणार आहे. सदर मान्यता ही वित्त विभागाच्या निर्देशानुसार दि. १५ ऑगस्ट, २०२३ पर्यंत लागू राहील. त्यापुढील भरती प्रक्रिया वित्त विभागाच्या शासन निर्णय दि. ३० सप्टेंबर, २०२२ नुसार सुधारित आकृतिबंध शासनाने मान्य केल्यावरच करता येणार आहे.
जिल्हा परिषदांतील गट-क मधील सर्व संवर्गाची (वाहनचालक व गट-ड संवर्गातील पदे वगळून) रिक्त पदे संवर्गनिहाय आरक्षण नियमानुसार निश्चित करून जिल्हा परिषदांनी त्यांच्या स्तरावर जिल्हा निवड मंडळामार्फत परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक देण्यात आले आहे.